खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी कारभाराविरोधात कारवाईची मागणी - पोलिसांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2021

खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी कारभाराविरोधात कारवाईची मागणी - पोलिसांना निवेदन

खासगी बसेसना शिस्त लावावी याबाबतचे निवेदन पोलिसांना देताना एन. एस. पाटील, ॲड. संतोष मळवीकर व नितीन फाटक

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        एसटी बस बंद असल्याने खासगी बसेसकडून जादा भाडे आकारले जात आहे. तसेच खासगी बस वाहतूक मालकांच्या मनमानी वर्तनामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रवासामध्ये खूप असंतोष आहे. तरी या सर्व खाजगी बस चालकांची बैठक बोलावून शिस्त लावावी अशी मागणी  केली आहे. याबाबतचे निवेदन एन. एस. पाटील, ड. संतोष मळवीकर व नितीन फाटक यांनी आज पोलीस प्रशासनाला दिले.

         चंदगड तालुक्यातून मुंबई, पुणे प्रवासासाठी अनेक खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस चंदगड तालुक्यातून कार्यरत आहेत. या बस मालकांच्या मनमानी वर्तनामुळे प्रवाशांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व बसेस फिरून गारगोटी मार्गे पुण्या-मुंबईकडे जातात. हा प्रवास खूप त्रासाचा व कंटाळवाणा आहे. शिवाय यासाठी जादा प्रवास भाडे द्यावे लागते. तसेच प्रवासाला वेळ खूप लागत असून बसेस वेळेत पोहोचत नाहीत. कधी उशिरा तर कधी रात्रीअपरात्री पोचतात. त्यामुळे अनेक अडचणींना प्रवाशांना तोंड द्यावे लागते. तर प्रवास भाडे किती घ्यायचे यावर बंधन नाही. एसटी बसेस बंद असल्याने खाजगी वाहतुकदार खूप जादा भाडे आकारत आहेत. त्यामुळे प्रवासामध्ये खूप असंतोष आहे. तरी या सर्व खाजगी बस चालकांची बैठक बोलावून शिस्त लावावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.

No comments:

Post a Comment