चंदगड : सी एल वृत्तसेवा
खालसा सावर्डे (ता. चंदगड) येथील गंगुबाई भरमू पाटील (वय ७६) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गावातील कृषी कन्या सहकारी व्यावसायिक दूध संस्थेचे संस्थापक चेअरमन व गावातील काळाम्मा देवी सहकारी दूध व्यवसायिक संस्थेचे सेक्रेटरी तसेच माजी मंत्री सतीश पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते जयसिंग पाटील व पोल्ट्री व्यावसायिक दौलत पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:
Post a Comment