चंदगड / प्रतिनिधी
रामपूर (ता. चंदगड) चे नागरिक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागिलगे शाळेतील अद्यापक बाबुराव वरपे यांची सर्वोदय शैक्षणिक संस्था गगनबावडा जि. कोल्हापूर या संस्थे मार्फत दिला जाणारा जिल्हास्तरीय 'गुरुदेव समाज रत्न' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार हा वंचित व भटक्या समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी भरीव कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला किंवा शिक्षकाला दिला जातो.श्री वरपे हे उत्कृष्ठ शैक्षणिक कार्याबरोबर शाळा व समाजासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात.गेली बत्तीस वर्षे समाजातील गरीब व वंचित घटक,भटका समाज, ऊसतोडणी व वहातूक कामगार यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वखर्चाने शैक्षणिक साहित्य, गणवेश, दप्तर, शिक्षणासाठी आर्थिक मदत,माता भगिनींना साड्या व स्वेटर व सणासुदीच्या काळात मिठाई व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, साक्षरता वर्ग,प्रतीवर्षी वृक्षरोपे वाटप , आरोग्य तपासणी शिबिर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे अनेक उपक्रम राबवत असतात. या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment