गवसे येथील रमेश देसाई यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

27 March 2026

गवसे येथील रमेश देसाई यांचे निधन

रमेश सगुण देसाई

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 
गवसे (ता. चंदगड) येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश सगुण देसाई (वय 66) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी दिनांक 26 मार्च 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, तीन भाऊ, दोन बहिणी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते अनेक वर्षापासून सांगाती पतसंस्थेच्या चंदगड येथील शाखेचे सल्लागार होते. तसेच गवसे येथील ब्रह्मानंद सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे संस्थापक संचालक होते. शुक्रवारी दिनांक 27 रोजी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

No comments:

Post a Comment