
चंदगड : चोरांच्या टोळीकडून ताब्यात घेण्यात आलेल्या दुचाकीसह पोलीस अधिकारी व कर्मचारी.
चंदगड : सी एल वृत्तसेवा
माणगाव (ता. चंदगड) येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची टोळी दुचाकी चोरून आणून विक्री करण्यात गुंतली होती. या चोरांच्या टोळीचा चंदगड पोलिसांनी छडा लावून नुकतीच जेरबंद केली. साईनाथ दयानंद सावंत (रा. माणगाव, ता. चंदगड) या संशयित मुख्य आरोपी असणाऱ्या विद्यार्थ्यांवर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अन्य दोघेजण अल्पवयीन असल्याने त्यांना सुधारगृहात पाठवण्यात येणार आहे. या चोरट्याकडून चोरून आणलेल्या दुचाकी पुन्हा विक्री करून मिळवलेल्या रकमेतील 21 हजार रुपये रोख रक्कम व तीन लाख रुपयांच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
साईनाथ व दोन साथीदारानी मागील काही महिन्यामध्ये ढोलगरवाडी, मुगळी, जक्कनहट्टी, कोवाड, चंदगड या ठिकाणाहून दुचाकी चोरून आणल्या होत्या. यापैकी काही दुचाकी शिवणगे व माणगाव या गावातील लोकांना कमी किमतीत विकल्या. त्यांच्याकडून आणखी कोणत्या गावातून चोरी झाले आहे का, याबाबत तपास सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांनी सांगितले. सदर चोरांच्या टोळीकडून कडून १५ हजार ते चाळीस हजार रुपये अशा किमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विशाल मुळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. बी. गेंगजे, वसीम देसाई, आनंदा नाईक, राजेश अंबुलकर, सुनील माळी, अजय वाडेकर, ईश्वर नावलगी, दिगंबर गायकवाड, नितीन पाटील, ऋषीराज कोरवी, गोविंद जाधव, आनंद देसाई यांच्या पथकाने ही कारवाई केली.
No comments:
Post a Comment