कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
सालाबाद प्रमाणे हनुमान जयंती निमित्त श्री हनुमान तालीम मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने कुदनूर (ता. चंदगड) येथे यावर्षीही भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता होणाऱ्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. प्रथमेश हट्टीकर कंग्राळी विरुद्ध पै. गुरु जोंधळेकर बाणगे यांच्यात होणार आहे. याशिवाय अनुक्रमे पै. पृथ्वीराज पाटील कंग्राळी विरुद्ध पै. सुरेश नरके बाणगे, निखिल पाटील कंग्राळी विरुद्ध निलेश हिरुगडे बानगे, भूमिपुत्र मुतगा विरुद्ध सोहम सुतार बाणगे, सुमित कडोली विरुद्ध श्री शिंदे बाणगे, साई मार्केट यार्ड कंग्राळी विरुद्ध दादू तुर्केवाडी यांच्यात होणार आहेत. याच बरोबर अन्य ५० कुस्त्या मैदानच्या दिवशी म्हणजे २ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता जोड पाहून नेमल्या जाणार आहेत. तरी इच्छुक पैलवान वस्ताद यांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे. यासाठी 9483946470, 9552236233 या मोबाईल क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव आंबेवाडकर व सिद्राम गुंडकल सर यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment