चंदगड तालुक्याला पावसाने झोडपले, भात नाचना पिकाला फुटले कोब, शिवारही झाला जलमय - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2021

चंदगड तालुक्याला पावसाने झोडपले, भात नाचना पिकाला फुटले कोब, शिवारही झाला जलमय

 

सुगीत सतत पंधरा दिवस पडलेल्या पावसाने खळ्यावरील भात पिकाला फुटलेले कोंब हतबल होऊन पहाताना डुक्करवाडी (ता. चंदगड) येथील छोटा शेतकरी.

  चंदगड/प्रतिनिधी :-( नंदकुमार ढेरे) :- 

निसर्गाच्या दृष्ट चक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांचा पावसाने पिच्छाच पूरवला आहे.कोरोनात कसाबसा जीव वाचवलेल्या शेतकऱ्यांची महापूराने मोठी दैना उडवली. महापूरातुन जगवलेली पिके जगवून हातातोंडाशी आली असतानाच  ऐन सुगीच्या हंगामात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दैना उडवली.

ऐन सुगीत पावसाने झोडपल्याने सोनारवाडी (ता. चंदगड) येथे खळ्यावरच भात मळणी भिजत आहेत.

          आज (बुधवारी) रामप्रहरी सुमारे दोन तास कोसळलेल्या जोरदार पावसाने कापलेल्या भात, नाचणा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विजांच्या कडकडाटासह चंदगड तालुक्यातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. गेल्या पंधरवडय़ापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.रोजचेच वातावरण असे राहणार म्हणून अनेकांनी भात कापणी आणि मळणीला सुरुवात केली होती.नाचणीची कणसे धरुन घरात रचून ठेवली आहेत. अचानक बूधवारी सकाळी सुमारे चार तास पाऊस कोसळला. यामध्ये कापलेल्या भात पिकांत पाणी साचून लाखो रुपयांचे नुकसान झाले. 

भात पिकाला फुटलेले कोंब

            खळ्यावरील मळलेले आणि न मळलेले भात भिजून मोठे नुकसान झाले. तसेच पिंजरही काळे पडल्याने वाळक्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. झालेला पाऊस उभ्या असलेल्या ऊस पिकाला लाभदायी ठरला असला तरी कारखान्याच्या ऊसतोडी थांबल्या. शेतात ओल झाल्याने कारखान्यांची उसाने भरलेली वाहने फडातच अडकून पडली आहेत. या पावसामुळे कारखाने काहीकाळ बंद करण्याची वेळ येणार आहे.चंदगड तालुक्यातील भात, नाचणी, ऊस या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीनी शेतकर्याना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.


No comments:

Post a Comment