झांबरे येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक दीपक गोरे गुणवंत पुरस्काराने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

24 December 2021

झांबरे येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक दीपक गोरे गुणवंत पुरस्काराने सन्मानित

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

             झांबरे (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक दीपक गोरे याना शैक्षणिक  क्रीडा व सांकृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय  कार्याबद्दल इचलकरंजी येथील आविष्कार फौंडेशनचा जिल्हा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

        गोरे यांनी गेल्या दोन वर्षात सामाजिक भावनेतून शाळेच्या विकासासाठी सहकारी शिक्षकांच्या मदतीने तीन लाखाहून अधिक लोकवर्गणी व चौदावा वित्त आयोगातून शाळेचा भौतिक विकास केला आहे. यामध्ये शाळेला स्पीकर मंच, फिल्टर स्टील कपाट, रंगमंच, संगणक संच , संरक्षण भिंत ग्रंथालय खोली, प्रिंटर, भित्तीपत्रक, खुर्च्या, आकर्षक गेट व शाळेची स्टील नावे नाविन्यपूर्ण ध्वज कट्टा, रंगरंगोटी, आकर्षक बोलकी डिजिटल शाळा, पाणपोई सुसज्ज ऑफिस एक विद्यार्थी एक कुंडी लागवड मैदान निर्मिती, वृक्ष लागवड, वृत्तपत्र वाचन कट्टा, प्रयोगशाळा, खेळाचे साहित्य, शौचालय, गमत जमत वर्ग ठिबक सिंचन रेन हार्वेस्टिंग आदी बाबीचा समावेश आहे. वरील सर्व बाबीची निर्मिती आकर्षक व नाविन्यपूर्ण करण्यात आली आहे. या कार्याची  दखल घेवून दिपक गोरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. गटशिक्षणाधिकारी एस. एस. सुभेदार, विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, केंद्रप्रमुख जी. बी. जगताप, सरपंच विष्णू गावडे, गणेश अकालोड, विठोबा पाटील, सुनील देसाई, परशराम धबाले यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment