प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचा थरार शनिवारपासून - चंदगड लाईव्ह न्युज

24 December 2021

प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचा थरार शनिवारपासून

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         प्राथमिक शिक्षकांच्या कोल्हापूर जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचा थरार २५ व २६ डिसेंबर आणि १ व २ जानेवारी रोजी राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील छ. शिवाजी महाराज स्टेडियम वर रंगणार आहे. सर्व संघटना प्राथमिक शिक्षक मंच चंदगड यांच्या वतीने 'गुरुवर्य चषक क्रिकेट स्पर्धा २०२१' चे आयोजन करण्यात आले आहे.

        स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रोख रु. ११ हजार, ८ हजार, ५ हजार, ३ हजार अशी बक्षिसे असून वैयक्तिक मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट कर्णधार, उत्कृष्ट यष्टीरक्षक व प्रत्येक सामन्यातील सामनावीर साठी रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत. स्पर्धा आयोजनासाठी 

          रमेश हुद्दार, धनाजी कृ. पाटील, सदानंद गा. पाटील, सुनील बा. कुंभार यांच्यासह सर्व  शिक्षकांचे आर्थिक सहाय्य लाभले आहे. स्पर्धेतील स्मृतिचिन्हे मारुती एम गुरव विमा सल्लागार यांनी दिली आहेत. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ २५ रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील बारा तालुक्यातून १६ तुल्यबळ संघांचा स्पर्धेत सहभाग आहे. क्रिकेटप्रेमी तालुक्यातील क्रिकेटप्रेमींनी स्पर्धेतील थरारक सामन्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षक मंच व सर्व शिक्षक संघटनांकडून करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment