कोल्हापूर येथील निबंध स्पर्धेत अनुजा लोहार प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

24 December 2021

कोल्हापूर येथील निबंध स्पर्धेत अनुजा लोहार प्रथम

कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते निबंध स्पर्धेचे पारितोषिक स्वीकारताना अनुजा लोहार


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

           निट्टूर  (ता. चंदगड) येथील अनुजा दत्तात्रय लोहार हिने कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. सखाई बहुउद्देशीय सेवा संस्था व विश्वकर्मा समाज सेवा संघटना महाराष्ट्र, शाखा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

         तिने 'जीवनातील खेळाचे महत्व' या विषयावरील निबंध सादर केला होता. ती नरसिंह हायस्कूल येथे दहावीच्या वर्गात शिकत आहे. 'कोल्हापुरी शब्दसरी' काव्यलेखन  स्पर्धेत तिच्या 'आणि शाळा बोलू लागली' या कवितेला पारितोषिक मिळाले. याशिवाय विविध ठिकाणच्या वक्तृत्व स्पर्धेत तिने गेल्या चार-पाच वर्षात अनेक पारितोषिके पटकावली आहेत. तिला याकामी वडील तसेच विद्यालयाचे शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment