विंझणे येथे शिव पुतळ्यास दुग्धाभिषेक करून कर्नाटक शासनाचा निषेध - चंदगड लाईव्ह न्युज

24 December 2021

विंझणे येथे शिव पुतळ्यास दुग्धाभिषेक करून कर्नाटक शासनाचा निषेध

 विंझणे येथे शिवपुतळ्यास दुग्धाभिषेक करताना शिवप्रेमी नागरिक

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

            नुकत्याच कर्नाटकची राजधानी बेंगलोर येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना मोकाट सोडणाऱ्या कर्नाटक शासनाचा विंझणे (ता. चंदगड) येथे निषेध करण्यात आला. गावातील मध्यवर्ती ठिकाणी शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्यात आला. 

          यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या शिवप्रेमींनी गुंड प्रवृत्तीच्या कानडी समाजकंटकांचा तीव्र शब्दात निषेध केला. त्यांना पाठीशी घालणाऱ्या तसेच सीमा भागातील मराठी माणसावर अत्याचार करणाऱ्या कर्नाटक शासनाचा व शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी शिवप्रेमी तरुण, तरुणी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment