गडहिंग्लज श्रमिक पत्रकार संघाचा दिनकर पाटील यांना पुरस्कार जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

24 December 2021

गडहिंग्लज श्रमिक पत्रकार संघाचा दिनकर पाटील यांना पुरस्कार जाहीर

पत्रकार दिनकर पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        गडहिंग्लज  श्रमिक  पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणार पुरस्कार दै. सकाळचे नेसरी बातमीदार दिनकर मारूती पाटील तारेवाडी (ता. गडहिंग्लज) यांना जाहीर झाला असल्याची माहिती जेष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांनी दिली. 

        पत्रकार दिनाचे औचित्य साधून बुधवार (ता.५) जानेवारी रोजी सकाळी १० वाजता  शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज येथे विशेष कार्यक्रमात जेष्ठ साहित्यिक डाॅ. राजा शिरगुप्पे यांच्या हस्ते दिनकर पाटील यांचा पुरस्कार देऊन गौरव होणार आहे. दिनकर पाटील हे गेल्या १२ वर्षापासून दै. सकाळ मध्ये नेसरी बातमीदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजवर पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उत्तम कार्याची दखल घेऊन श्रमिक पत्रकार संघातर्फे  हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

         दिनकर पाटील हे श्री. लिंगदेव दुध  संस्था तारेवाडीचे व्हा. चेअरमन, तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय नेसरीमध्ये महाविद्यालय विकास समिती सदस्य,  नेसरी विभाग स्वाभिमानी पत्रकार संघाचे सचिव म्हणून कार्यरत असून अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा नेसरीचे माजी सचिव म्हणूनही कार्य केले आहे. त्यांनी राज्यशास्त्र, इतिहास या दोन विषयात एम. ए. केले असून बी. एड हा व्यावसायिक कोर्स पूर्ण केला आहे. त्यांनी उत्कृष्ट गुणाने पत्रकारिता, ग्रंथालय, हस्तसामुद्रिक हा कोर्स पूर्ण केला आहे. दिनकर पाटील यांचा  सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमीच सहभाग असतो. पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर झाल्याने पाटील यांच्यावर  गडहिंग्लज उपविभागातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment