कालकुंद्री येथे अज्ञातांकडून गाडीची तोडफोड, दूध संस्थेचे कुलूप तोडले - चंदगड लाईव्ह न्युज

24 December 2021

कालकुंद्री येथे अज्ञातांकडून गाडीची तोडफोड, दूध संस्थेचे कुलूप तोडले

अज्ञाताने फोडलेल्या चार चाकी गाडीच्या काचा.


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

           कालकुंद्री (ता. चंदगड) येथे काल गुरुवार दिनांक २३ रोजी मध्यरात्री च्या सुमारास अज्ञात चोरट्याने बस स्टॅन्ड नजीक श्री कृष्ण दूध संस्थेचा दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न केला. तथापि चोरट्याच्या हाती काही लागले नसल्याचे समजते. 

          यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात थांबवलेल्या मैनुद्दीन शेख यांच्या टाटा एस हौदा गाडीच्या काचा फोडून होऊन नुकसान केले. या दोन्ही घटनांतील व्यक्ती एकच असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसात नोंद झाली नसल्याचे समजते. बस स्टॅन्ड चौक परिसरात नेहमी घडणाऱ्या अशा असामाजिक घटनांना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने स्टॅन्ड चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment