साहित्यिक पांडूरंग कुंभार प्रतिष्ठान कोवाडचे साहित्य पुरस्कार जाहिर, शनिवारी कोवाड येथे पुरस्कार प्रदान समारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

10 December 2021

साहित्यिक पांडूरंग कुंभार प्रतिष्ठान कोवाडचे साहित्य पुरस्कार जाहिर, शनिवारी कोवाड येथे पुरस्कार प्रदान समारंभ

डॉ. प्रभाकर शेळके            विठ्ठल गावस                 बा. स. जठार

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

        साहित्यिक पांडूरंग कुंभार प्रतिष्ठान कोवाड (ता. चंदगड) यांच्या वतीने कांदबरीकार, कथाकार आणि स्वामीकार रणजित देसाई यांचे लेखनिक पांडूरंग कुंभार यांच्या स्मृतिपित्यर्थ "वेगळ्या वाटा उत्कृष्ट कथा संग्रह पुरस्कार" साठी कथासंग्रह मागविणेत आले होते. फक्त "कथा संग्रह" या साहित्य प्रकारासाठी दिले जाणारे पुरस्कार शनिवारी सकाळी ११ वाजता कला महाविद्यालय कोवाड (ता. चंदगड) येथे वितरित करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे अनंत कुंभार, संजय कुंभार आणि विनायक कुंभार यांनी जाहीर केले आहे. 

       गेल्या ऑगष्ठमध्ये सदर पुरस्कारांसाठी साहित्यिक पांडूरंग कुंभार प्रतिष्ठान, कोवाड यांचे वतीने कांदबरीकार, कथाकार आणि स्वामीकार  रणजित देसाई यांचे लेखनिक पांडूरंग कुंभार यांच्या स्मृतिपित्यर्थ 

              "वेगळ्या वाटा उत्कृष्ट कथा संग्रह पुरस्कार"

          साठी कथासंग्रह मागविणेत आले होते. या पुस्तकातून तज्ञ परिक्षकांच्या सहाय्याने पुढील पुस्तकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 

                        *१)  प्रथम पुरस्कार*

                          कथासंग्रह - *व्यवस्थेचा बइल*

                         लेखक - डॉ. प्रभाकर शेळके 

                        स्वरूप

                        ५००१ रुपये रोख रक्कम,

                         सन्मानचिन्ह, 

                         गौरवपत्र 

                         शाल व श्रीफळ 

२) द्वितिय पुरस्कार

     कथासंग्रह - फिंगर बाऊल 

     लेखक - विठ्ठल गावस 

     स्वरूप -

     २००१ रुपये रोख रक्कम

     सन्मानचिन्ह,  

     शाल व श्रीफळ 

                         ३) विशेष पुरस्कार

                             कथासंग्रह - भाकरीची शपथ

                             लेखक - बा. स. जठार

                             स्वरुप - सन्मानचिन्ह

                            सन्मानपत्र

                            शाल व श्रीफळ

         पुरस्कार प्रदान कार्यक्रम साहित्यिक, सिनेनिर्माता व पत्रकार विजयकुमार दळवी व साहित्यिक गुणवंत पाटील यांच्या हस्ते सम्पन्न होणार आहे. अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य कल्लापा भोगण असणार आहेत. प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच अनिता भोगण, किर्तीकुमार देसाई सरकार तसेच राजू पोतदार यांची उपस्थिती आहे. यावेळी विजयकुमार दळवी यांच्या माणसातली माणसं या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. इतर प्रमुख उपस्थिती मध्ये एम. व्ही. पाटील, व्ही. आर. पाटील (प्राचार्य कला महाविद्यालय कोवाड), एस. एन. पाटील (प्राचार्य श्री राम विद्यालय कोवाड), श्रीकांत वै. पाटील (मुख्याध्यापक केंद्रीय प्राथमिक शाळा, कोवाड), पांडुरंग जाधव, विरुपाक्ष गणाचारी, रामचंद्र आंबेवाडकर, शिवाजी आडाव, जोतिबा वांद्रे, अनंत मुळीक, विरभद्र हेरेकर, केदारी पाटील, आप्पया तेली, नारायण कणुकले, ए. टी. पाटील, कल्लापा वांद्रे, उत्तम मुळीक, पी. एस. भोगण (विस्तार अधिकारी), चंद्रकांत कुंभार, सौ. मधुमती उदय शिंदे, श्रीमती पारू मदन नाईक, संजय मष्णू पाटील, रामा व्हन्याळकर, लक्ष्मण आडाव,  लक्ष्मण व्हन्याळकर, सरपंच व सदस्य (ग्राम पंचायत कोवाड), अध्यक्ष व सदस्य (कुंभार समाज मंडळ, कोवाड), अध्यक्ष व सदस्य (व्यापारी संघटना, कोवाड), तुकाराम पेडणेकर, प्राथमिक शिक्षक मंच कोवाड वरील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. तरी सर्वानी उपस्थित राहण्याचे  अनंत पांडुरंग कुंभार, संजय पांडुरंग कुंभार, विनायक पांडुरंग कुंभार, गणपती जनार्दन कुंभार, अशोक जनार्दन कुंभार, चित्तरंजन कल्लापा कुंभार रामचंद्र निंगाप्पा कुंभार, लक्ष्मण निंगाप्पा कुंभार, बाबू लिंगाप्पा कुंभार व  संतोष अर्जुन कुंभार यांनी आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment