नेहरू युवा केंद्र कोल्हापूर यांच्या मार्फत हलकर्णी येथे कोविड १९ जनजागृती अभियान - चंदगड लाईव्ह न्युज

10 December 2021

नेहरू युवा केंद्र कोल्हापूर यांच्या मार्फत हलकर्णी येथे कोविड १९ जनजागृती अभियान

हलकर्णी हायस्कूलमध्ये कोविड १९ विषयी जनजागृती करताना. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

       युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र, कोल्हापूर यांच्या मार्फत कोविड १९ जनजागृती अभियान व जलशक्ती-अभियान हलकर्णी (ता. चंदगड) हायस्कूल येथे राबवण्यात आला. या अभियानात शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले. सहभागी झालेल्यांना मास्क वाटप देखील करण्यात आले. नेहरू युवा केंद्र, कोल्हापूर स्वयं सेवक अमेय सबनीस यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

No comments:

Post a Comment