वनपाल दत्तात्रय पाटील यांची कोल्हापुर जिल्हा वनखाते कर्मचारी पतसंस्था अध्यक्षपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

10 December 2021

वनपाल दत्तात्रय पाटील यांची कोल्हापुर जिल्हा वनखाते कर्मचारी पतसंस्था अध्यक्षपदी निवड

कर्मचारी पतसंस्था कोल्हापुरच्या अध्यक्षपदी वनपाल दत्तात्रय पाटील व उपाध्यक्षपदी बुधाजी कांबळे यांच्या सत्कार कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       कोल्हापुर जिल्हा वनखाते कर्मचारी पतसंस्था कोल्हापुरच्या अध्यक्षपदी   वनपाल दत्तात्रय हरी पाटील यांची तर उपाध्यक्षपदी बुधाजी सखाराम कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्याबददल पाटणे वनपरिक्षेत्रच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

निवडीनंतर एकमेकांना शुभेच्छा देताना.

       सन १९८८ मध्ये या संस्थेची स्थापना झालेली होती. संपुर्ण कोल्हापुर जिल्हा कार्यक्षेत्र असणारी ही वन विभागाची एकमेव अर्थवाहीनी आहे. श्री. पाटील यांनी यापूर्वी कोल्हापुर जिल्हा वन संघटनेचे अध्यक्ष पद भुषविले आहे. पतसंस्थेचा सर्व व्यवहार व कार्यभार पारदर्शीपणे राबवुन सर्व सभासदांचे हिताचे निर्णय घेऊन वन पतसंस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे त्यांनी नमुद केले आहे.

      ७ कोटी रुपयांची आर्थीक उलाढाल असलेली ही पतसंस्था आहे. गेल्यावर्षी ३८ लाखांचा निव्वळ नफा झालेला आहे. अध्यक्ष व उपअध्यक्ष होण्याचा मान प्रथमच आजरा चंदगड तालुक्यात मिळाला आहे. कारण श्री पाटील हे मुळचे घाटकरवाडी आजरा येथील असून चंदगड तालुक्यामध्ये वनपाल पाटणे म्हणुन कार्यरत आहेत. गेल्याच वर्षी त्यांना महाराष्ट्र शासनाचे वन सेवेचे सुवर्ण पदक मिळाले आहे. श्री. पाटील यांनी विविध विषयांवर लेख, कविता, पोवाडे लिहीले आहेत. अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वनपाल बी. आर. भांडकोळी होते. प्रस्ताविक व स्वागत वनरक्षक एस. बी. तांबेकर यांनी केले. यावेळी वनपाल एन. एम. धामणकर, लिपीक शिवाजी कांबळे, वनरक्षक प्रकाश शिंदे, वनसेवक शशिकांत शिंदे इत्यादींनी मनोगत व्यक्त केले. आभार वनरक्षक एम. आय. सनदी यांनी मानले. यावेळी सर्व वनपाल, वनरक्षक व वनकर्मचारी हजर होते. 

No comments:

Post a Comment