केदारी रेडेकर रुग्णांलयात वरगाव येथील अपघातग्रस्त मुलीच्या पायावर यशस्वीपणे मोफत शस्त्रक्रिया, अनिरुध्द रेडेकर यांचा पुढाकार - चंदगड लाईव्ह न्युज

10 December 2021

केदारी रेडेकर रुग्णांलयात वरगाव येथील अपघातग्रस्त मुलीच्या पायावर यशस्वीपणे मोफत शस्त्रक्रिया, अनिरुध्द रेडेकर यांचा पुढाकार

गडहिंग्लज येथे रेडेकर रुग्णालयात वैशाली नाईक या विद्यार्थ्यीनीच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रियेवेळी उपस्थित अनिरुद्ध रेडेकर, डाॅ शैलेंद्र सावंत, विठ्ठल नाईक आदी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          वरगाव-नाईकवाडा (ता. चंदगड) येथील वैशाली धोडिंबा नाईक या शाळकरी मुलीचा शाळेत खेळताना अपघात होवून पायाला गंभीर दुखापत झाली होती. तिची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने पायावर शस्त्रक्रिया करणे अवघड होते. पण अनिरुद्ध रेडेकर यांच्या पुढाकाराने कै. केदारी रेडेकर रुग्णांलयात या मुलीच्या पायावर मोफत यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली.  

      चंदगड तालुक्यातील वरगांव (नाईकवाडा) दाटे येथील वैशाली नाईक हिचा काही दिवसांपूर्वी शाळेत खेळताना अपघात झाला होता. त्यावेळी तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. वैशालीच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पायाची शस्त्रक्रिया करणे अवक्या बाहेरील होते. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बसवंत नाईक यांना समजताच त्यांनी अनिरुद्ध रेडेकर यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर त्यांच्या सहकार्याने कै. केदारी रेडेकर रुग्णालय येथे पायावर मोफत शस्त्रक्रिया करून त्या कुटुंबाला सहकार्य करण्यांत आले. डॉ. शैलेंद्र सावंत यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.

No comments:

Post a Comment