डुक्करवाडी येथील अवैध गावठी दारु छाप्यातील आरोपींची सब जेलमध्ये रवानगी - चंदगड लाईव्ह न्युज

10 December 2021

डुक्करवाडी येथील अवैध गावठी दारु छाप्यातील आरोपींची सब जेलमध्ये रवानगी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      अवैधरित्या गावठी दारु बनविताना चंदगड पोलिसांनी छापा टाकला. मात्र त्यावेळी संशयित आरोपी यल्लाप्पा संतु नाईक (वय 63, डुक्करवाडी, ता. चंदगड) हा पळून गेला होता. चंदगड पोलिसांनी त्याला पकडून न्यायालयात हजर केले. त्याची दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्याची रवानगी कोल्हापूर येथील सब जेलमध्ये करण्यात आली. 

      यासंदर्भात माहीती अशी – डुक्करवाडी (ता. चंदगड) येथे गावठी हातभट्टीची दारु अवैधरित्या काढत असल्याची माहीती पोलिसांना कळाली. यानुसार त्यांनी १ डिसेंबर २०२१ रोजी धाकलू रवळू देवन यांच्या शेताच्या वरील बाजूस लागून असलेल्या गवत व झाडेझुडपे असलेल्या रानात बेकायदा बिगर परवानगी भट्टी पेटवून मानवी शरीरास अपायकारक असलेली गावठी हातभट्टीची दारू तयार करत असताना चंदगड पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांची चाहूल लागताच आरोपी यल्लाप्पा संतू नाईक डुक्‍करवाडी येथून पळून गेला. प्रोहिबिशन गुन्ह्याचा तयार माल, पत्र्याचे बॅरेल, प्लास्टिक बॅरल, रसायन व इतर साहित्य असा एकूण 12,640 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला. भारतीय दंड विधान कलम 328 प्रोहिबिशन एट कलम 65 (क) (ई) (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. शोध घेतल्यावर आरोपी डुक्करवाडी येथे ६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री बारा सापडला. त्याची वैद्यकीय तपासणी करून अटक करण्यात आली. ७ डिसेंबर २०२१ रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असताना दोन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. ९ डिसेंबर २०२१ रोजी न्यायालयाने आरोपीस रिमांड वॉरंट काढून सब जेल बिंदू चौक कोल्हापूर येथे पाठविण्याचे आदेश दिले व रवानगी केली.

No comments:

Post a Comment