चंदगड अर्बन चषक २०२१ चा अंतिम सामना होणार रविवारी, बांदेश्वर बांदा विरुध्द के. के. शिनोळी यांच्यात होणार लढत - चंदगड लाईव्ह न्युज

10 December 2021

चंदगड अर्बन चषक २०२१ चा अंतिम सामना होणार रविवारी, बांदेश्वर बांदा विरुध्द के. के. शिनोळी यांच्यात होणार लढत

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        क्रिकेट प्रेमीसाठी एक पर्वणी असलेल्या चंदगड अर्बन चषक २०२१ साठी अंतिम विजेता कोण असणार याकडे चंदगडकरांचे लक्ष लागले आहे. रविवारी १२ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी सकाळी १० वाजता तृतीय क्रमांकासाठी युवा स्पोटर्स V/S  आर. बी. सोर्टस यांच्या लढत होईल. तर फायनलमध्ये अंतिम विजेतेपदासाठी तुफान फटकेबाजीने प्रेक्षकांची मने जिंकलेल्या बांदेश्वर बांदा V/S के. के. शिनोळी या दोन्ही संघात लढत होईल. अशी माहीती बँकेचे चेअरमन दयानंद काणेकर यांनी दिली.

       ५ नोहेंबर २०२१ पासून स्पर्धेला सुरवात झाली होती. स्पर्धेमध्ये २६ संघांनी सहभाग घेतला होता. अवेळी अनेकदा आलेल्या पावसामुळे स्पर्धा लांबली. अखेर रविवारी या स्पर्धेतील अंतिम सामना होऊन स्पर्धेची सांगता होणार आहे. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रिंडागणामध्ये सामने खेळवले जात आहेत. 

      विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी ७१,०००/- (दयानंद काणेकर व मारुती कुंभार यांच्याकडून) द्वीतीय क्रमांकासाठी ४१,०००/- (प्रमोद कांबळे यांच्याकडून), तृतीय क्रमांकासाठी २१,०००/- वैजाप्पा शिवलिंगाप्पा वाली यांच्याकडुन) तर चतुर्थ क्रमांकासाठी ११,०००/- (फिरोज अब्दुलरशिद मुल्ला यांच्याकडून) बक्षिस आहेत. 

        त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी ३००१ (अभिजित शांताराम गुरबे यांच्याकडून), मॅन ऑफ द मॅचसाठी ३००१ (बाबू बाळा हळणदकर यांच्याकडून), उत्कृष्ट फलंदाजसाठी ३००१  व उत्कृष्ट गोलंदाजसाठी ३००१ (मंडळाकडून) रुपयांचे बक्षिस आहेत. 

        त्याचबरोबर मॅन ऑफ द स्पर्धा भरविण्याचे हे तिसरे वर्ष आहे. २०१८ साली पहिल्यांदा स्पर्धा भरविल्या गेल्या. २०१८ साली पी. के. इलेव्हन संघाने अजिंक्यपद पटकावले होते. २०१९ साली एस. के. ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला होता. तर २०२० साली कोरोनाच्या संकटामुळे स्पर्धा रद्द करण्यात आली होती. यावर्षी कोण बाजी मारतो याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

         स्पर्धा भरविण्याचे हे तिसरे वर्ष आहे. २०१८ साली पहिल्यांदा स्पर्धा भरविल्या गेल्या. २०१८ साली पी. के. इलेव्हन संघाने अजिंक्यपद पटकावले होते. २०१९ साली एस. के. ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला होता. तर २०२० साली कोरोनाच्या संकटामुळे स्पर्धा रद्द करण्यात आली होती. यावर्षी कोण बाजी मारतो याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.      

महत्वाची सुचना - 

     वरील दोन्ही मॅचमधील तुफानी फटकेबाजी पाहण्यासाठी आमच्या Chandgad Live News या न्युज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबक व शेअर करा. जेणेकडून या मॅचचे अपडेट आपल्याला लगेच आपल्या मोबाईलवर मिळतील. अधिक माहीतीसाठी आताच https://www.youtube.com/c/ChandgadLiveNews या आमच्या चॅनलला सबस्क्राईबक करा व इतरांनाही सांगा.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------


No comments:

Post a Comment