ब्लॅकमेल करून विनयभंग केल्याप्रकरणी उमगाव येथील एकाला अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी - चंदगड लाईव्ह न्युज

16 December 2021

ब्लॅकमेल करून विनयभंग केल्याप्रकरणी उमगाव येथील एकाला अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी


चंदगड / प्रतिनिधी

     उमगाव (ता. चंदगड) येथे एकाने ब्लॅकमेल करून विनयभंग केल्याप्रकणी चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी रविंद्र भिवा गावडे (रा. उमगांव ता. चंदगड, जि. कोल्हापुर) या युवकाला अटक करण्यात आले असून हा प्रकार जुन 2020 ते नोव्हेंबर 2021च्या दरम्यान मुदतीत वेळोवेळी फिर्यादीच्या घरी उमगांव (ता.चंदगड) येथे घडला आहे.

 पोलिसातुन मिळालेली माहीती अशी की,रविंद्र गावडे हा फिर्यादीच्या पतीचा मित्र असुन त्यांचे फिर्यादीच्या घरी येणे-जाणे होते. जुन 2020 ते नोव्हेंबर 2021चे दरम्यान आरोपी याने फिर्यादीला मोबाईलवर फोटो काढून व अश्लील संभाषण रेकॉर्ड करून ते पतीला सांगण्याची धमकी देवून विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. तसेच पतीला ठार मारतो अशी धमकी देवुन ब्लॅकमेल केल्याचाही आरोप केला असून त्यानुसार चंदगड पोलीस ठाण्यात स्वता हजर राहुन पिडीत  महिलेने  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी रविंद्र गावडे याला चंदगड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार यांचेसमोर हजर केले असता दोन  दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. हा युवक माजी पोलीस पाटील असल्याचे समजते. अधिक तपास पोसई कारंडे करत आहेत. 


No comments:

Post a Comment