स्वातत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्य शिवशक्ती हायस्कूल अडकूर येथे वनविभागाकडून वृक्षारोपण - चंदगड लाईव्ह न्युज

29 December 2021

स्वातत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्य शिवशक्ती हायस्कूल अडकूर येथे वनविभागाकडून वृक्षारोपण

सामाजिक वनीकरण विभाग चंदगडच्या वतीने अडकूर येथे  विद्यार्थ्याना वृक्ष भेट देताना वनरक्षक टी. पी. भोसले

अडकूर /सी. एल. वृत्तसेवा

        भारतीय आजादिच्या अमृत महोत्सवानिमित्य शिवशक्ती हायस्कूल अडकूर (ता. चंदगड) येथे वनविभागाकडून ७५ वृक्षांचे वृक्षारोपन करण्यात आले. चंदगड सामाजिक वनिकरण विभागाच्या वतीने चंदगड तालूक्यात आजदिच्या अमृत महोत्सवानिमित्य प्रत्येक शाळेत ७५ रोपांचे वृक्षारोपन करण्यात येत आहे. 

        या उपक्रमाअंतर्गत अडकूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजध्ये वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी वनरक्षक टी. पी. भोसले, वनपाल आर. वाय. पाटील, सौ. एस. एच. नदाफ, श्रीकांत कांबळे आदि वन विभागाचे अधिकारी तसेच प्रा. रामदास बिर्जे, प्रा. व्ही. पी. पाटील, प्रा. एम. पी. पाटील, आय. वाय. गावडे, एस. के. पाटील यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment