पारगड शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दयानंद पाटील, उपाध्यक्षपदी बाबुराव कोरवी यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2021

पारगड शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दयानंद पाटील, उपाध्यक्षपदी बाबुराव कोरवी यांची निवड

  कागणी : सी. एल. वृत्तसेवा

शिक्षक संघाचे पदाधिकारी व विद्या मंदिर  तांबुळवाडीचे प्राथमिक शिक्षक दयानंद भरमाणा पाटील ( रा. बागिलगे ) यांची हलकर्णी (ता. चंदगड) यांची पारगड प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन पदी तर  व्हाईस चेअरमनपदी विद्यामंदिर कागणीचे शिक्षक बाबुराव बाळाप्पा कोरवी (रा. हेरे) यांची निवड बिनविरोध झाली. संचालक मंडळात दयानंद महादेव पाटील (रा. तांबुळवाडी), प्रकाश मारुती नांदुडकर (किणी), अनिल जयराम पाटील (कडलगे बु.), जोतीबा मारुती मस्कर (नागरदळे), रमेश सिद्धाप्पा बुरूड (नागणवाडी), विष्णू बाबु पाटील (नरेवाडी), सिद्राम शंकर सरशेट्टी (सुंडी), तर संचालिका मंगल संजय नौकुडकर (माणगाव), संध्या संजय सोनार (नागरदळे) उपस्थित होत्या.


दयानंद पाटील यांना चेअरमनपदी निवडीसाठी सुचक अनिल पाटील व अनुमोदक सिद्राम सरशेट्टी होते. तर बाबुराव कोरवी यांना व्हाईस चेअरमनपदी निवडीसाठी सुचक म्हणून जोतीबा मस्कर व अनुमोदक रमेश बुरुड होते.

संचालक मंडळ बिनविरोध व्हावे, यासाठी शिक्षक बँक संचालक शिवाजी पाटील, शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश हुद्दार,  माजी चेअरमन आर. आर. पाटील, संस्थापक डी. एम. पाटील, अशोक नौकुडकर, दस्तगीर उस्ताद, परशराम नाईक, सदानंद पाटील, विष्णू पाटील, अनिल पाटील, टी. जे. पाटील, भरमु तारिहाळकर, भरमाणा मुरकुटे, अंनत मोटर , जोतीबा कडगावकर, नागोजी भोसले, दिनकर तावडे, शिवाजी बाबुराव पाटील यांच्यासह  कर्मचारी मारुती दळवी इत्यादीनी परिश्रम घेतले.
No comments:

Post a Comment