जिल्हास्तरीय् युवा महोत्सवात कोवाड महाविद्यालय "लोक कला" प्रकारात अव्वल - चंदगड लाईव्ह न्युज

29 December 2021

जिल्हास्तरीय् युवा महोत्सवात कोवाड महाविद्यालय "लोक कला" प्रकारात अव्वल

युवा मोहासवात लोककला सादर कला महाविद्यालय कोवाडचे विद्यार्थी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         कोवाड येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड (ता. चंदगड) ने  लोक कला या सांघिक कला प्रकारात 41 व्या जिल्हा स्तरीय युवा महोत्सवात अत्यन्त सुंदर बहारदार साधारीकरण करून प्रेक्षकानची दाद मिळवली. या संघाची मध्यवर्ती  महोत्सव सर्धेसाठी  निवड झाली. महागाव येथे होणाऱ्या  मध्यवर्ती  स्पर्धेसाठी हा संघ सहभागी होत आहे.

          यामध्ये सांगली कोल्हापूर व सातारा  जिल्ह्यातील् विविध महाविद्यालयातील विविध कला प्रकाराचे वैयक्तिक आणि सांघीक स्पर्धा प्रकार होत आहेत. त्यातील "लोककला" या स्पर्धे साठी कोवाडच्या संघाला प्राचार्य डॉ. व्ही. आर.  पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आर. डी. कांबळे, डॉ. व्ही. के. दळवी हे विशेष परिश्रम घेत आहेत.

         या संघाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए .एस. जांभळे, सचिव एम. व्ही.पाटील  यांनी कलाकरांचे अभिनंदन करून मध्यवर्ती स्पर्धेला  शुभेचछा देण्यात आल्या. सदर कार्यक्रमासाठी संस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. आर. डी. कांबळे, डॉ. व्ही. के. दळवी,  प्रा. शीतल मंडले, प्रा. विजयमाला साळुंखे विशेष परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment