बसवंत चिगरे महाराष्ट्र प्रतिमा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित, दि न्यू इंग्लिश स्कूलचे अष्टपैलू व्यक्तिमत्व - चंदगड लाईव्ह न्युज

29 December 2021

बसवंत चिगरे महाराष्ट्र प्रतिमा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित, दि न्यू इंग्लिश स्कूलचे अष्टपैलू व्यक्तिमत्व

बसवंत चिगरे महाराष्ट्र प्रतिमा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

             इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटर अंतर्गत कोल्हापूर येथील कला, साहित्य, सामाजिक लोकसंवाद प्रतिमा संमेलन यांच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्र प्रतिमा आदर्श शिक्षक पुरस्कार दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगडचे गणित विषयाचे शिक्षक व विद्यार्थीप्रिय, अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले बसवंत चिगरे यांना देण्यात आला. 

          कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात रात्रीस खेळ चाले या मराठी मालिकेतील सुप्रसिध्द कलाकार माधव अभ्यंकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. शिक्षण व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिंचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.  शिक्षण क्षेत्रातील नवोउपक्रमात सरांचे मोठे योगदान आहे. सामान्यज्ञान परीक्षेत त्यांचे शेकडो विद्यार्थी चमकले आहेत.

दि न्यू इंग्लिश स्कूलचे गणित विषयाचे तज्ज्ञ अध्यापक, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक, सेमी इंग्रजी माध्यमाचा गणित विषयाचा सलग चौदा वर्षे शंभर टक्के निकाल  लावून विक्रम करणारे, चंदगड, आजरा व गडहिंग्लज भागात मुलांचे लेझिम पथक ट्रेनर म्हणून नावलौकिक मिळवणारे बसवंत रेमाण्णा चिगरे यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षकांची पतसंस्था शाखा कोवाड संचालकपदी म्हणून काम करत आहेत. त्यांच्या या शिक्षण व सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे.

          प्राचार्य आर. आय. पाटील . यांनी अभिनंदन केले.यावेळी ज्येष्ठ अध्यापक एन.डी. देवळे, आर.पी. पाटील, एम. व्ही.कानूरकर, टी. टी. बेरडे, एस.जी. साबळे, पुष्पा सुतार, सूरज तुपारे, डी.जी. पाटील, टी. व्ही. खंदाळे उपस्थित होते . श्री.चिगरे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार  मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment