तुडिये कबड्डी स्पर्धेत कालकुंद्री संघ अजिंक्य, थरारक अंतिम सामन्यात तुडिये वर एक गुणाने मात - चंदगड लाईव्ह न्युज

05 December 2021

तुडिये कबड्डी स्पर्धेत कालकुंद्री संघ अजिंक्य, थरारक अंतिम सामन्यात तुडिये वर एक गुणाने मात

तुडिये कबड्डी स्पर्धेत अजिंक्य ठरलेला कालकुंद्री संघ मान्यवरांच्या हस्ते बक्षीस स्वीकारताना.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          तुडिये (ता. चंदगड) येथे पार पडलेल्या ५८ किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेत कालकुंद्री (ता. चंदगड) येथील कल्मेश्वर स्पोर्ट्स क्लब संघाने अजिंक्यपद पटकावले. स्पर्धेत नामांकित वीस संघांनी सहभाग घेतला होता.             थरारक अंतिम सामन्यात कालकुंद्री संघाने यजमान तुडिये संघावर केवळ एका गुण फरकाने थरारक विजय मिळविला. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत राहिल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी पाच चढाया देण्यात आल्या होत्या. यात कालकुंद्री संघाने बाजी मारली. उत्कृष्ट चढाईपटू म्हणून कालकुंद्रीच्या राणबा याला गौरवण्यात आले. विजेत्या संघाकडून कर्णधार राजेंद्र खवनेवाडकर, सुमित पाटील, गौतम कांबळे, आकाश मोरे, प्रसाद पाटील, साहिल पाटील, विजय मुर्डेकर, प्रथमेश पाटील, अनिकेत भांदुर्गे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. संघ व्यवस्थापक म्हणून शुभम पाटील यांनी मार्गदर्शन केले. विजेत्या संघाला माजी पंचायत समिती सभापती जगन्नाथ हुलजी व मान्यवरांच्या हस्ते रोख रु १० हजार व ढाल देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेचे आयोजन रामलिंग क्रीडा मंडळ तुडीये यांनी केले होते.

No comments:

Post a Comment