शिवणगे येथील सानिया मुगांरेने राज्यस्तरीय गायन स्पर्धेत दुसर्‍या वर्षाही मारली बाजी, दिल्ली येथे होणाऱ्या स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व - चंदगड लाईव्ह न्युज

08 December 2021

शिवणगे येथील सानिया मुगांरेने राज्यस्तरीय गायन स्पर्धेत दुसर्‍या वर्षाही मारली बाजी, दिल्ली येथे होणाऱ्या स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व

रियाज करताना सानिया मुंगारे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       शिवणगे (ता. चंदगड) येथील सानिया धनाजी मुंगारे हिने राज्यस्तरीय गायन स्पर्धेमध्ये महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तिची दिल्ली येथे होणाऱ्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शास्त्रीय गायन स्पर्धेसाठी दुसऱ्यांदा निवड झाली आहे. 

          सानिका हिने वयाच्या १२ व्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे. तीने २०१७ला गंगामाई वाचन मंदिर आजरा येथील जिल्हास्तरीय गायन स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर २०१८साली सलग दुसऱ्या वर्षी  तिने प्रथम क्रमांक मिळवत आपले कौशल्य सिद्ध केले. तसेच जागृती हायस्कूल गडहिंग्लज येथे आयोजित २०१७ आणि २०१८ साली जिल्हास्तरीय गायन स्पर्धेत सलग दोन वर्ष प्रथम क्रमांक मिळवला. मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंच, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित गायन स्पर्धेत २०१९आणि २०२० साली सलग २ वर्षे भावगीत व नाट्यगीत या दोन्ही प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. तर पश्चिम महाराष्ट्र संगीत सम्राट या राजस्तरीय गायन स्पर्धेत सांगली दत्तवाड येथे प्रथम क्रमांक मिळवला. त्यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते तिला पारितोषिक मिळाले होते. भारत गायन समाज, पुणे येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळवला होता. क्लासिकल व्हाईस ऑफ इंडिया, पुणे येथे झालेल्या स्पर्धेत तुतीय क्रमांक मिळवला होता. इंद्रधनू कलाविष्कार संस्था, मिरज यांनी घेतलेल्या राज्यतरीयस्पर्धेत ती अंतिम फेरीत पोहचली. कृष्णामाई संस्थान घाट सातारा वाई येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत पुन्हा ती प्रथम आली.भरत नाट्य संशोधन मंदिर पुणे येथे झालेल्या स्पर्धेत ती प्रथम आली. 

        कलर्स मराठी वरील' सूर नवा द्यास नवा' या वाहिनीवरील छोटे सुरविर साठी तिची निवड झाली. तसेच२०२० साली झालेल्या कला उत्सव या राष्ट्रीय शास्त्रीय गायन स्पर्धत महाराष्ट्रात प्रथम तर देशात तुतीय क्रमांक पटकावला. तसेच २०२०साली झालेल्या कला उसव या राष्ट्रीयस्पर्धत ती महाराष्ट्रात प्रथम तर देशात तुतीय आली. पुन्हा तिने २०२१ साली सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्रात ३६ जिल्यामधून महाराष्ट्र प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.

No comments:

Post a Comment