संत गजानन पॉलिटेक्निकला थ्री स्टार रेटिंग, प. महाराष्ट्रातून एकमेव कॉलेज, भारत सरकार कडून सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

08 December 2021

संत गजानन पॉलिटेक्निकला थ्री स्टार रेटिंग, प. महाराष्ट्रातून एकमेव कॉलेज, भारत सरकार कडून सन्मानित

संत गजानन महाराज पॉलिटेक्निकला भारत सरकार कडून थ्री स्टार रेटिंग ने सन्मानित करण्यात आला. प्रमाणपत्रासमवेत प्राचार्य डॉ. संजय दाभोळे व आय.आय.सी.चे टिम...

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        महागाव (ता. गडहिंग्लज)येथील संत गजानन महाराज पॉलीटेक्निक मध्ये राबवण्यात आलेल्या केंद्रीय मानव संसाधन विकास, केंद्रीय शिक्षण मंत्रालय व इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत वर्षभर घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे परीक्षण करून भारत सरकारने थ्री स्टार रेटिंग देऊन सन्मानित केला अशा प्रकारचे रेटिंग महाराष्ट्रातील दोनच कॉलेजला प्राप्त झाला असून त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव या कॉलेजला बहुमान प्राप्त झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी दिली.                         

       केंद्र सरकारच्या स्टार्ट अप इंडिया, व्होकल फोर लोकल, मेक इन इंडिया या प्रकल्प अंतर्गत नवीन संशोधन व संकल्पना चालना मिळावी. या उद्देशाने दरवर्षी उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी बद्दल देशभरातील विविध संस्थाना रेटिंग देऊन गौरवण्यात येतो. यावर्षी महाराष्ट्रातून दोनच संस्थाची निवड झाली. त्यापैकी  येथील पॉलिटेक्निकला चार पैकी तीन रेटिंग प्राप्त झाले. ग्रामीण भागातील स्टार्टअपला गती मिळावी या उद्देशाने या पॉलिटेक्निकमधील आयआयसी टीम वर्षभरात इनोव्हेशन, स्टार्ट अप, इन्व्हेस्टमेंट व फंडिंग या विषयावर वेबिनार, वर्कशॉप, ट्रेनिंग, तज्ञांकडून मार्गदर्शन, फिल्ड व्हिजिट चे यशस्वी आयोजन केले. या सर्व उपक्रमाचे अहवाल मूल्यमापन करून स्टार रेटिंग ने सन्मानित करण्यात आला या उपक्रमाचा सर्वत्र कौतुक होत आहे. 

        या यशामध्ये प्राचार्य डॉ. संजय दाभोळे, प्रा. रोहिणी पाटील, प्रा. राजेंद्र मोरे, प्रा. संतोष गुरव, प्रा. अब्दुल मुल्ला याबरोबरच आय. आय. सी चे सर्व टीम, आजी व माजी विद्यार्थी, व्यवस्थापक, शिक्षकांचे योगदान मिळाले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थाध्यक्ष ड. आण्णासाहेब चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, सचिव ड. बाळासाहेब चव्हाण यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment