कागणी : सी. एल. वृत्तसेवा
कोवाड - बेळगाव या मार्गावरील होसूर (ता. चंदगड) येथील रहिवासी व शेतकरी लक्ष्मण सुभाना राजगोळकर यांच्या म्हशीचा शुक्रवारी सर्पदंश होऊन मृत्यू झाला. या घटनेत सदर शेतकऱ्याचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. बेळगाव रोडला लागून असलेल्या शिवारात सदर म्हैस चरावयास सोडली होती. या दरम्यान दुपार च्या सुमारास सर्पदंश झाला. सायंकाळी सदर म्हशीचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment