तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
गडहिंग्लज तालूक्यातील शाळांना सामाजिक वनिकरन विभाग गडहिग्लज परिक्षेत्राकड्न मोफत वृक्षरोप वाटप करण्यात येणार आहेत.
हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील रोपवाटीकेतून प्रत्येक शाळेला ७५ रोपे मोफत वाटण्यात येणार आहेत. यासाठी ज्या शाळांना मोफत रोपे पाहिजे असतील अशा शाळांनी रोप मागणी पत्र दिल्यास अशी रोपे हडलगे येथील रोपवाटीकेतून दिली जाणार आहेत.
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्य प्रत्येक शाळांनी शाळेच्या आवारात ७५ खड्डे काढून सामाजिक वनीकरण हडलगे रोपवाटिकेतून ७५ रोपे लागवडीसाठी मोफत नेण्याचे आवाहन सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात आले.
No comments:
Post a Comment