छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबनेचा अडकूर ग्रामस्थांकडून निषेध - चंदगड लाईव्ह न्युज

20 December 2021

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबनेचा अडकूर ग्रामस्थांकडून निषेध

पुतळा विटंबनेचा निषेध नोंंदविताना अडकूर ग्रामस्थ.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      कर्नाटकमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व अडकुर (ता. चंदगड) येथील गावकरी घटनेच्या निषेध केला. सर्वंजण एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घातला. या विकृत व्यक्तीचा व विकृत कर्नाटक सरकारचा वृत्तीचा निषेध करण्यात आला. यावेळी गणेश दळवी, शिवराज देसाई, संदीप घोरपडे, सुहास घोरपडे, राकेश आपटेकर, सुरेश आबीटकर, सुशांत, मनोज परीट, संदिप देसाई, अनुज पाटील, लक्ष्मण, राजू कापसे, शंकर भेकणे, मनोहर देसाई व अडकूर गावचे व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment