राजा शिवछत्रपती महाविद्यालयात भितीपत्रकाचे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

20 December 2021

राजा शिवछत्रपती महाविद्यालयात भितीपत्रकाचे उद्घाटन

भितीपत्रकाचे उद्घाटन करताना अखलाकभाई मुजावर, यावेळी अॅड. दिनकरराव धरणगुत्ती, डॉ. रचना मुसाई आदी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       महागाव येथील राजा शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयात गडहिंग्लज तालुका शिवसहकार संघटनेचे संघटक अखलाकभाई मुजावर यांचे राष्ट्रीय अल्पसंख्यांक व्यक्ती समूह आणि त्यांचे हक्क' हे व्याख्यान संपन्न झाले. अध्यक्षस्थानी डॉ. निवास जाधव तर अॅड. दिपकराव धरणगुती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

                                                जाहिरात

जाहिरात

         कार्यक्रमाचे स्वागत डॉ. व्ही. जी. सूर्यवंशी यांनी तर प्रास्ताविक प्रा. एम. डी. माने यांनी केले. यावेळी डॉ. रचना मुसाई, डॉ. के. पी. देशमुख उपस्थित होते. यावेळी इंग्रजी विभागामार्फत विविध अल्पसंख्यांक समाजाच्या लेखकांनी लिहिलेल्या कविता व विचार संग्रहाच्या भित्तीपत्रकाचे अखलाकभाई मुजावर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कुपेकर यांची प्रेरणा व मुख्य लिपिक बी. ए. पाटील यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment