मजरे कार्वे येथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्यांचा निषेध करताना ग्रामस्थ. |
मजरे कार्वे / सी. एल. वृत्तसेवा
मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील शिव-कला व सांस्कृतिक मंडळामार्फत बंगलोर येथील सदाशिवनगर मध्थे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याचा संतापजनक प्रकाराचा संपूर्ण परिसरात शिवप्रेमींनी तीव्र निषेध मजरे कार्वे गावातील नागरिकांनी केला.
‘‘महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्याचे काही कारण नव्हते. सीमा वाद हा स्वतंत्र विषय आहे. कन्नडीगांचे महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्याचे धाडसच कसे झाले ? त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत."
‘‘ज्या देवतेमुळे आपण उभे आहोत. त्याची विटंबना केली जात असेल तर कन्नडीगांना महाराष्ट्रात राहू द्यायचा की नाही. याचा विचार करावा लागेल.’’
‘‘देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हे हिंदवी स्वराज्य उभे राहिले. शिवाजी महाराजांनी कर्नाटकचे, त्यांच्या सीमांचे रक्षण केले. त्यामुळे ते आज सुरक्षित आहेत. त्यांना कठोर शासन व्हावे.
"बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना प्रकरण अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही.
यावेळी रमेश बोकडे, याल्लुप्पा बोकडे, दिनकर बोकडे, संभाजी बोकडे, शिवाजी वि. बोकडे, सुभाष बोकडे, नामदेव बिर्जे, कल्लापा बोकडे, लखन बिर्जे, प्रशांत प्र. बोकडे, आनंद सुतार, जयंत बोकडे, युवराज बोकडे, संभाजी द.बोकडे, विलास बोकडे, पांडुरंग पवार, नारायण बोकडे, विठ्ठल बोकडे, लक्ष्मण भोसले, निखिल बोकडे, निलेश बोकडे, रोहित शि.बोकडे, ओमाण्णा हाजगुकर, राजेंद्र जो.बोकडे, प्रदीप बोकडे, अंकुश बोकडे, राहुल बोकडे, रघुनाथ बोकडे आदींसह नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment