'दौलत'च्या सेवानिवृत्त कामगारांची देणी देण्याबाबत पंधरा दिवसात वेळापत्रक तयार होणार - चंदगड लाईव्ह न्युज

20 December 2021

'दौलत'च्या सेवानिवृत्त कामगारांची देणी देण्याबाबत पंधरा दिवसात वेळापत्रक तयार होणार

दौलत कारखान्याचे संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        दौलत कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांची थकित देणी देण्याचे वेळापत्रक एकमताने तयार करावे याबाबत अथर्व इंटरट्रेड, दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालक व सर्व श्रमिक संघाची दौलत साखर कारखान्याच्या निवृत्त कामगार समितीमध्ये झालेला बैठकीत एकमत झाले. 

                                                जाहिरात

जाहिरात

            बैठकीला अथर्व इंटरट्रेडचे अध्यक्ष मानसिंगराव खोराटे, सेक्रेटरी अनिल काटे, दौलतचे अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, जेष्ठ संचालक गोपाळराव पाटील यांच्यासह संचालक व  संघटनेचे अध्यक्ष कॉ. अतुल दिघे, व प्रतिनिधी गोविंद गावडे, सुरेश सुतार, जानबा बोकडे, जे. जी. पाटील, पताडे आदी उपस्थित होते. १५ दिवसात याबाबत चर्चा करून  वेळापत्रक लेखी स्वरूपात अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. व दौलत कारखान्याच्या सही शिक्याने गेटवर लावावे असे ठरले. याबाबत कामगारांना उत्सुकता असून हे वेळापत्रक पाहण्यासाठी कामगार दिनांक ३ जानेवारी २२ रोजी सकाळी ११ वाजता कारखाना गेट जवळ जमणार आहेत. निर्णयानंतर झालेल्या कामगारांच्या सभेत करण्यात आला. 

          यावेळी दौलत निवृत कामगार एकजुटीचा विजय असो, सर्व श्रमिक संघाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. सकाळी ११ वाजता कारखाना साईट वरील गणपती मंदिरात मोठ्या संख्येने कामगार जमले होते. सभेमध्ये अध्यक्ष कॉ अतुल दिघे यांनी मार्गदर्शन केले. गोविंद गावडे यांनी प्रास्ताविक केले. सुरेश सुतार यांनी कामगार देण्याच्या याद्या वाचल्या.

No comments:

Post a Comment