जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत विकास संस्था गटातून चंदगडचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांची बिनविरोध निवड - चंदगड लाईव्ह न्युज

21 December 2021

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत विकास संस्था गटातून चंदगडचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांची बिनविरोध निवड

आमदार राजेश पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत विकास संस्था गटातून चंदगडचे  विद्यमान आमदार राजेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नंतर आमदार पाटील यांची महाआघाडी गटातून जिल्हा बँकेवर बिनविरोध झालेली ही तिसरी जागा आहे.

जाहिरात
जाहिरात

           चंदगड तालुका विकास संस्था गटातून आमदार पाटील यांच्यासह मोहन संतू परब असे दोघांचेचे अर्ज होते. परब यांनी माघार घेतल्याने आमदार पाटील यांची बिनविरोध निवड झाली. ही निवड बिनविरोध होण्यासाठी माजी मंत्री भरमू पाटील व माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी मध्यस्थी केली. कै. नगरसिंगराव पाटील हे या गटातून बँकेत संचालक होते. त्यांच्या निधनाने रिक्त आमदार राजेश पाटील यांना स्विकृत्त संचालक म्हणून घेण्यात आले होते.

             या निवडणुकीत आमदार पाटील यांच्यासह परशराम पाटील, मोहन परब यांचे अर्ज छाननीनंतर शिल्लक राहीले होते. काही दिवसांपुर्वी परशराम पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे या गटातून आमदार पाटील व परब असे दोन अर्ज शिल्लक होते. त्यानंतर परब यांच्या माघारीसाठीच्या आमदार पाटील यांनी माजी मंत्री भरमू पाटील यांची भेट घेऊन प्रयत्न केले. त्यानंतर महाडीक, पी. एन. यांनी माजी मंत्री पाटील यांना संपर्क साधून परब यांचा अर्ज आज दुपारी मागे घेण्यात आला. त्यामुळे जिल्हा बँकेवर चंदगड तालुका विकास संस्था गटातून आमदार पाटील यांची निवड बिनविरोध झाली.

No comments:

Post a Comment