कोवाड महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

21 December 2021

कोवाड महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

कोवाड महाविद्यालयाचे कर्मचारी दयानंद पाटील, मारूती बिर्जे आदी काम बंद आंदोलन करताना

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील  प्रशासकीय  कर्मचारी  यांचे १८ डिसेंबर २०२१ पासून कोवाड महाविद्यालयासमोर काम बंद आंदोलन सुरु आहे. कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यासाठी सुरु असलेले हे आंदोलन राज्यशासन आणि महाविद्यालय व विद्यापीठीय सेवक समितीच्या वतीने  विविध प्रलंबीत  मागण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात  येथील सेवकांनी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणा देऊन तीव्र निषेध नोंदवला आहे. यामध्ये दयानंद पाटील, मारुत्ती बिर्जे, परशराम पाटील, नामदेव पाटील, लक्ष्मण बगीलगेकर, दीपक पाटील,अजित व्हण्याळकर हे प्रशासकीय सेवक सहभागी झाले आहेत.

No comments:

Post a Comment