अर्चना शिंदे यांना 'क्रांतिज्योती सावित्रीची लेक' पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2022

अर्चना शिंदे यांना 'क्रांतिज्योती सावित्रीची लेक' पुरस्कार

अर्चना शिंदे

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         सावित्रीबाई फुले तथा बालिका दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने  'क्रांतिज्योती सावित्रीची लेक २०२२' या पुरस्काराचे वितरण नुकतेच कोल्हापूर येथे करण्यात आले. 

       यंदा चंदगड तालुक्यातून मराठी विद्यामंदीर तुर्केवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना गोविंद शिंदे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने अर्चना यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल संघटनेच्यावतीने घेण्यात आली. पुरस्काराचे वितरण कोल्हापूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिक्षण सभापती रसिका पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर आदी   मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. याकामी गटशिक्षणाधिकारी सौ सुमन सुभेदार, विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, केंद्र प्रमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment