कु. रागिनी राजाराम गुरव |
ऐतिहासिक किल्ले कलानिधी गडाच्या कुशीत वसलेल्या कलिवडे (ता. चंदगड) येथील कु. रागिनी राजाराम गुरव हिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले.
शिष्यवृत्तीधारक रागिनी गुरव हिचे अभिनंदन करताना मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक |
जिल्हा परिषद मराठी विद्या मंदिर कलिवडेची विद्यार्थिनी रागिनी 'इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२१' मध्ये २६८ गुण मिळवून शिष्यवृत्तीधारक ठरली आहे. भौतिक सोयी सुविधांपासून दूर दुर्गम, डोंगराळ परिसरात राहूनही तिने मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी अनुकरणीय ठरले आहे. तिला वर्गशिक्षक सतीश माने, मुख्याध्यापक दत्तात्रय भाटे, अध्यापक मंगेश शिंदे आदींचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षण विभाग चंदगड यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
No comments:
Post a Comment