डी. टी. कांबळे यांचा पंचायत समिती मार्फत सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2022

डी. टी. कांबळे यांचा पंचायत समिती मार्फत सत्कार

चंदगड पं. स. स्तरावरील सेवक सह. पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डी. टी. कांबळे यांची निवड झालेबद्दल सत्कार करताना सभापती कांबळे, बाजूला ग. वि. अ.बोडरे, कांबळे, ॲड कडूकर आदी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           येथील पंचायत स्तरावरील सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डी. टी. कांबळे यांची निवड झालेबद्दल पं. स. सभापती ॲड. अनंत कांबळे  गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.

         सभापती ॲड. कांबळे यांनी शिक्षण क्षेञातील एक प्रगल्भ ,व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून दाटे केंद्रप्रमुख कांबळे यांच्या अनुभवाचा फायदा  पंचायत समिती स्तरावरील सेवक पतसंस्थेच्या वृध्दीसाठी होईल असे सांगितले. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळीॲड. विजय कडूकर, लेखाधिकारी अमर गारवे, राजाराम जोशी, सुनिल पाटील, दयानंद पवार, मलिक शेख, विजय कांबळे, शिक्षक पतसंस्थेचे मॅनेजर रवि माने आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment