नेसरी येथील महाविद्यालयात लसीकरणासंदर्भात बोलताना प्राचार्य आप्पासाहेब मटकर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
१५ ते १८ वयोगटातील लसीकरण शालेय स्तरावर प्राथमिक आरोग्य विभागामार्फत सुरुअसून पालकांनी आपल्या मुलांचे वेळीच लसीकरण पूर्ण करून शैक्षणिक नुकसान टाळावे असे आवाहन छ. शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आप्पासाहेब मटकर यांनी केले.
15 ते 18 वयोगटातील कोराना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य मटकर बोलत होते ते म्हणाले, ``पुन्हा कोरानाचा प्रसार होऊ लागला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांचे भवितव्य अद्याप अधांतरी राहिले आहे. सर्व पालकांनी आपल्या बरोबरच पाल्याची ही खबरदारी घेऊन कोराना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या इ.9 ते12वीच्या विद्यार्थ्यांना कानडेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत लस देण्यात येत आहे. या लसीकरणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. डॉ. विजयकुमार नाईक यांनी लसीकरणाचे महत्व विशद केले. या प्रसंगी डॉ. भावना खांडवी, डॉ. किरण नलवडे, एस. पी. कांबळे, एस. बी. मोरे, साक्षी हराळे, आशा पाटील, अश्विनी रेडेकर, सविता कांबळे यांच्यासह पर्यवेक्षक ए. डी. लोहार, पी. एस. कांबळे, तरवाळ सर्व शिक्षक उपस्थित होते. सुत्रसंचालन एस. जे. कालकुंद्रीकर यांनी केले तर आभार एस. जे. बुगडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment