शाळा-महाविद्यालय तातडीने पूर्ववत सुरू करा - शिक्षक, पालकांची मागणी, तहसीलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2022

शाळा-महाविद्यालय तातडीने पूर्ववत सुरू करा - शिक्षक, पालकांची मागणी, तहसीलदारांना निवेदन

 

शाळा-महाविद्यालय तातडीने पूर्ववत सुरू या मागणीचे निवेदन तहसिलदारांना देताना पालकवर्ग.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      ओमायक्रॉंन संसर्ग परिस्थितीचा विचार करून शासनाने अनेक निर्बंध जारी केले आहेत. शाळा महाविद्यालय बंद केल्याने गेली दोन वर्ष विद्यार्थ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झालेले आहे. तरी शाळा व महाविद्यालय पूर्ववत चालू करावीत अशी मागणी चंदगड तालुक्यातील शिक्षक व पालक यांनी तहसीलदारांच्या झालेल्या बैठकीत केली आहे.

     कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत बंद असलेल्या शाळा सुरू होऊन फक्त दोन महिने झालेत, मात्र अचानक पुन्हा शाळा व महाविद्यालयातील दहावी व बारावी वगळता सर्व वर्ग बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदरची बाब दुर्देवी असून त्यामुळे भावी पिढीच बरबादी होणार आहे. एकीकडं राज्यात राजकीय, सांस्कृतिक क्रीडा इतर सर्व कार्यक्रम होत असताना विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या शाळा बंद होणे ही शोकांतिका आहे. पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार असताना व शिक्षक त्यांना शिकवायला तयार असताना असे निर्णय घेणे चुकीचे आहे. तरी शाळा, महाविद्यालय तातडीने पूर्ववत सुरू करावीत अन्यथा नाईलाजास्तव आम्ही आमच्या स्तरावर शाळा  सुरू करु असा इशाराही शासनाला दिला आहे. 

      तहसील कार्यालयातील या बैठकीला डॉ. ए. एस. जांभळे, प्रा. एन. एस. पाटील, ॲड. संतोष मळवीकर, एम. एम. तुपारे,  नरसु निर्मलकर,  लक्ष्मण गुंडू कडोलकर यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment