राजगोळी बुद्रुक येथील गुरुवर्य चषक शिक्षक क्रिकेट स्पर्धेत रायझिंग स्टार चंदगड संघ ठरला गुरुवर्य चषकाचा मानकरी - चंदगड लाईव्ह न्युज

12 January 2022

राजगोळी बुद्रुक येथील गुरुवर्य चषक शिक्षक क्रिकेट स्पर्धेत रायझिंग स्टार चंदगड संघ ठरला गुरुवर्य चषकाचा मानकरी

राजगोळी बुद्रुक येथील गुरुवर्य चषक शिक्षक क्रिकेट स्पर्धेतील विजेता रायझिंग स्टार संघ. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथे गुरुवर्य चषक शिक्षक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. राजगोळी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर या स्पर्धा झाल्या. यामध्ये रायझिंग स्टार चंदगड संघ ठरला गुरुवर्य चषकाचा मानकरी. 

           राजगोळी बुद्रुक येथे जिल्हास्तरीय शिक्षक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत एकूण 14 संघांनी सहभाग घेतला होता. उपांत्यफेरीत गगनबावडा संघाने कागल संघाला नमवुन व रायझिंग स्टार चंदगड संघाने करवीर संघाला नमवुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

            अंतिम सामन्याचे नाणेफेक बाळकृष्ण मूतगेकर, श्री. उस्ताद, बाबुराव परीट, आनंदा कांबळे यांच्या शुभहस्ते झाले. चंदगड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले उत्कृष्ट क्षेत्ररक्षण व अचूक गोलंदाजी माऱ्यामुळे निर्धारित 8 षटकात 68 धावामध्ये रोखले. प्रत्युत्तर देताना 69 धावांचे लक्ष्य 6.4षटकात पूर्ण केले. सचिन तेरणीकर यांनी सर्वाधिक 34 धावा जमविले व त्यांना 21 धावा जमवत मोलाची साथ दिली ती पुंडलिक गुरव यांनी. 

     अंतिम सामन्याचे 

सामनावीर -सचिन तेरणीकर,चंदगड

उत्कृष्ट फलंदाज-क्रांती सावंत,गगनबावडा

उत्कृष्ठ गोलंदाज --हमील पवार, चंदगड

उत्कृष्ट यष्टीरक्षक--आनंदा पोवार ,गगनबावडा

उत्कृष्ट क्षेत्ररक्षक --पुंडलिक गुरव,चंदगड

चंदगड संघाचा अष्टपैलू खेळाडू  सचिन गवळी याना मालिकावीर चषक देऊन गौरवण्यात आले.

गुरुवर्य चषक प्रथम बक्षीस व चषक --रमेश हुदार ,अध्यक्ष शिक्षक संघ चंदगड

द्वितीय बक्षीस व चषक --धनाजी पाटील,अध्यक्ष शिक्षक समिती चंदगड

तृतीय बक्षीस व चषक --सदानंद गा. पाटील,जिल्हा उपाध्यक्ष शिक्षक संघ कोल्हापूर

चतुर्थ बक्षीसव चषक--सुनील कुंभार, माजी चेअरमन पं. स. स्तरावरील पतसंस्था, चंदगड

  अंतिम सामन्यातील सर्व बक्षिसे मारुती गुरव, विमा व म्युच्युअल फंड सल्लागार यांच्या हस्ते देण्यात आले.

       सदर स्पर्धा यशस्वीपार पाडण्यासाठी चंदगड तालुक्यातील सर्व संघटना, पदाधिकारी ,प्रशासकीय अधिकारी, राजगोळी बुद्रुक येथील सर्व क्रिकेटप्रेमी तसेच तालुक्यातील सर्व क्रिकेटप्रेमींचे मोलाचे योगदान लाभले.

                                    


No comments:

Post a Comment