तेऊरवाडी (एस. के. पाटील)
राष्ट्रीय सेवा योजना श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
शाळे शेजारी असलेला दत्त मंदिर परिसर NSS विभागाच्या वतीने स्वच्छ करण्यात आला. या अभियानात 50 राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. एक सामाजिक बांधिलकी तसेच नैतीक कर्तव्य समजून ही स्वच्छता करण्यात आली. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एन. सूर्यवंशी, एस.के. पाटील, ईश्वर गावडे, व्ही. पी. पाटील ,आर. एम .बिर्जे. प्रकल्प अधिकारी एम. पी. पाटील यानी योगदान दिले. सर्वांचे आभार सह प्रकल्प अधीकारी आर . एम .बिर्जे यांनी मानले.
No comments:
Post a Comment