चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघामार्फत सभासदांना मकरसंक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर येशेल वाटप सरू असून सभासदांनी नजिकच्या शाखेतून आपले येशेल घेऊन जावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष तथा आमदार राजेश पाटील यांनी केले आहे.
चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभेत ठरल्याप्रमाणे १००० रूपयांचा शेअर्स पूर्ण असलेल्या सभासदांना तीन लिटर येशेल प्रति लिटर रूपये २० भरणा करून घेऊन देण्याचे ठरले. याप्रमाणे ज्या सभासदांचा रूपये १००० चा शेअर्स पूर्ण आहे. अशा सभासदांना येशेल वाटप चालू आहे. तरी शेअर्स पूर्ण असणाऱ्या सभासदांनी संघाचे नजिकच्या शाखेमध्ये जाऊन आपले कार्ड घेऊन सभासदानी येशेल उचल करावे असे आवाहन व्यवस्थापक एस. वाय. पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment