सैनिकांच्या पत्नींकडून जयंतीनिमित्त जिजाऊंना अभिवादन - चंदगड लाईव्ह न्युज

12 January 2022

सैनिकांच्या पत्नींकडून जयंतीनिमित्त जिजाऊंना अभिवादन

निपाणी येथे जिजाऊ जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करताना सैनिक पत्नी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या ४२४ व्या जयंतीनिमित्त निपाणी येथील सैनिकांच्या पत्नींनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. जिजाऊ म्हणजे देश रक्षणाची प्रेरणा. त्यांच्या प्रेरणेतूनच राजा छत्रपती शिवाजी व संभाजी राजे घडले. त्यांनी देश व धर्मावर आक्रमण करून रयतेला त्रास देणाऱ्या जुलमी राजवटींचा नायनाट केला. जिजाऊ, छत्रपती शिवाजी, छ. संभाजी यांचा वारसा चालवत आपले पती देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असून शत्रूंशी दोन हात करत आहेत. या जिजाऊ वंदनेतून सैनिकांच्या कार्य कर्तृत्वाला नक्कीच प्रोत्साहन, ताकद मिळेल यात शंका नाही.

      निपाणी येथील शिवछत्रपती सांस्कृतिक भवन येथे क्रांतिज्योती महिला मंडळाच्या वतीने पार पडलेल्या जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमासाठी सौ. वर्षा भाटले, सौ. कविता चव्हाण, सौ. गुणवंती मुधोळकर, सौ. सुप्रिया जाधव, सौ. मैथिली भाटले, सौ. बन्सी भाटले, सौ. मीनाक्षी वरुटे, सौ. रूपा वरुटे, सौ. शितल खवरे, सौ सीमा यडूरकर आदींसह महिला मंडळ सदस्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment