दशरथ पाटील |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कडलगे खुर्द (ता. चंदगड) येथील आदर्श विकाससेवा सोसायटीच्या चेअरमनपदी नारायण लक्ष्मण कांबळे व व्हा. चेअरमनपदी दशरथ तुकाराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या नुतन संचालकांच्या बैठकीत ही पदाधिकारी निवड झाली. सहा निबंधक ए. एस. काटकर अध्यक्षस्थानी होत्या. चेअरमन पदासाठी नारायण कांबळे यांचे नाव पांडुरंग पाटील यांनी सुचवले. त्याला शिवाजी पाटील यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमनसाठी दशरथ पाटील यांचे नाव बुधाजी पाटील यांनी सुचवले. त्याला ईश्वर पाटील यांनी अनुमोदन दिले.
संचालक अशोक पाटील, शिवाजी जाधव, शंकर बिर्जे, बिगल तुळसकर, निरंजना पाटील उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष जी, डी, पाटील यांच्या नेतृत्त्वाने निवडणूक बिनविरोध करण्यात आली. त्यांच्यासह सहाय्यक निबंधक कार्यालयाचे एम. व्ही. पाटील, उमेश तेली, चंदगड तालूका गट सचिव संघटनेचे अध्यक्ष मनोहर पाटील, श्रीकांत कदम, विठोबा कांबळे, पुंडलिक पाटील, नामदेव पाटील, निमेश कांबळे उपस्थित होते. सचिव सुरेश पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment