कुदनुरच्या शशिकांत आंबेवाडकरने मच्छे येथे आणली पानिपतच्या भूमितील माती - चंदगड लाईव्ह न्युज

12 January 2022

कुदनुरच्या शशिकांत आंबेवाडकरने मच्छे येथे आणली पानिपतच्या भूमितील माती

पानिपतच्या यूद्ध भूमिवरील माती आणण्यासाठी पानिपत येथे दाखल झालेला कुदनुरचा शशिकांत आंबेवाडकर

तेऊरवाडी / एस .के. पाटील
मच्छे (ता .जि. बेळगाव ) येथे दरवर्षीप्रमाणे शिवतेज युवा संघटनेतर्फे पानिपत शौर्य  दिन मोठ्या गांभिर्याने साजरा केला जातो . या शौर्य दिनासाठी पानिपतच्या रक्तरंजित भूमिवरील  माती कुदनूर ( ता. चंदगड ) येथील युवक  शशिकांत  रामचंद्र आंबेवाडकर यानी जाऊन आणली आहे . या मातिचे पूजन करून पानिपत युद्धात शहिद झालेल्या शुर विरांना अभिवादन करण्यात येणार आहे.

    मच्छे येथील शिव तेज संघटनेकडून पानिपत शौर्य दिन साजरा करण्यात येतो . यासाठी  दि .१० जानेवारी रोजी शिव तेज युवा संघटनेचे कार्यकर्ते  शशिकांत आंबेवाडकर  विमानाने हरियानाला गेले . तेथून  हरियाना पानिपत युध्द भूमिवर दाखल झाले . तेथील रक्तरंजित भूमिवरील माती घेऊन परत बेळगांवला आले .बेळगांव येथील कपिलेश्वर मंदिराजवळ एका कलशामध्ये ही पवित्र माती ठेवण्यात आली आहे . दि .१४ रोजी ही माती एका खास वाहनातून मच्छे येथे नेण्यात येणार आहे . मच्छे व परिसरातील नागरिकाना पानिपत रणभूमिवरील या पवित्र मातीला स्पर्ष करता येणार आहे . यावेळी सर्व कोविड नियमांचे पालन करत पानिपत युद्धाची सविस्तर माहती उपस्थिताना काही मान्यवर देणार आहेत .विशेष म्हणजे चंदगड मधील  या युवकाचा या सोहळ्यात सहभाग असणार आहे.

No comments:

Post a Comment