चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा शिरकाव झाला असून बुधवारी दोन पाॅझीटीव्ह रूग्ण सापडले आहेत. संपूर्ण देशभर पुन्हा एक वेळ कोरोनाची लाट आली आहे .चंदगड तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही . येत्या आठवडाभरात प्रचंड संख्येने रुग्ण सापडण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तवली जात आहे . तालुक्यातील मुरकूटेवाडी व चंदगड शहर येथील दोन पुरुषाचा नुकत्याच सापडलेल्या बाधीतांमध्ये समावेश आहे.चंदगड तालुक्यात कोरोनाच्या दोन लाटेपेक्षा तिसर्यांदा आलेली लाट तुलनेने उशीरा आली आहे.तरी सुध्दा नागरिकांनी विनाकारण मास्क शिवाय बाहेर फिरू नये,सॅनिटायझरचा वापर करून घरीच रहावे असे आवाहन तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment