मोबाईल बाजूला ठेवून पुस्तकांशी मैत्री केल्यास यश निश्चित - मधुमंजिरी मुतकेकर - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2022

मोबाईल बाजूला ठेवून पुस्तकांशी मैत्री केल्यास यश निश्चित - मधुमंजिरी मुतकेकर

मी कशी घडले या विषयावर बोलताना मधुमंजिरी मुतकेकर, सोबत प्राचार्य श्री. कुंभार.

तेऊरवाडी / सी. एल.  वृत्तसेवा

           जीवनात यश आपोआप मिळत नसते. यासाठी त्याग करावा लागतो. सतत मोबाईलच्या संगतीत अमूल्य वेळ वाया न घालता योग्य ध्येय उराशी बाळगून पुस्तंकांशी मैत्री केल्यास यश निश्चित प्राप्त होते. असे विचार निट परिक्षा उत्तीर्ण होऊन एमबीबीएसला प्रवेश मिळलेल्या कुदनूरच्या मधूमंजिरी बाळकृष्ण मुतकेकर यानी व्यक्त केले.

        कुदनूर (ता. चंदगड) येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूल कुदनुर  (ता. चंदगड) येथे आयोजित सत्कार समारंभात मी कशी घडले. या विषयावर मधूमंजिरी मुतकेकर बोलत होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. डी. कुंभार होते.

        यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उपसरपंच  नामदेव कोकीतकर , सुजय पाटील, एम. के. आंबेवाडकर, देवदत्त काळगे, एस. के. नागरदळेकर  बाळकृष्ण मुतकेकर, एस. आर. गुंडकल, नामदेव हेब्बाळकर, आर. बी. देसाई, एस. के. पाटील, मधूसुदन कोले, श्री. ओऊळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

           निट परिक्षा उत्तीर्ण होऊन एमबीबीएस ला पात्र ठरलेबद्दल मधुमंजिरी मुतगेकर हिचा प्राचार्य आर. डी. कुंभार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी  बाककृष्ण मुतकेकर, मारूती आंबेवाडकर, प्राचार्य आर. डी. कुंभार यांनी मनोगते केली. प्रास्ताविक एन. एस. गावडे, सूत्रसंचालन बाळकृष्ण गणाचारी यांनी केले.आभार नाना निर्मळकर यानी मानले.

No comments:

Post a Comment