चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कोल्हापूर साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये १२ वी च्या विध्यार्थ्यांसाठी शनिवार १२ फेब्रुवारी रोजी सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून हजारों रुपयांची बक्षिसे देणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश माने यांनी दिली.
यावेळी कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने म्हणाले, संस्थेचे उपाध्यक्ष व गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या संकल्पनेतून या परिक्षेची सुरवात झाली असून सध्याच्या संगणक युगात गणित या विषयाला महत्व आले. आय टी क्षेत्र असेल किंवा सध्याचे डेटा सायन्स किंवा मशीन लर्निंग सारखे नवीन क्षेत्र असो. त्यामधील संधीचा प्रत्येक विद्यार्थ्याला लाभ व्हावा व गणित या विषयाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेल्या भीतीमुळे न्यूनगंड निर्माण होऊन विध्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. ती भीती कमी व्हावी व विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश ठेवून गेल्या तीन वर्षांपासून आम्ही या परीक्षेचे आयोजन करत असून संपूर्ण महाराष्ट्रातून विध्यार्थी ही परीक्षा देत असतात.
ऑब्जेक्टीव्ह पद्धतीने होणाऱ्या १०० मार्क च्या परीक्षेत ५० प्रश्न असणार असून यामध्ये प्रामुख्याने MHT-CET च्या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा CET परीक्षेचा सुद्धा सराव होणार आहे.
निकाल ३१ मार्च रोजी घोषित करण्यात येणार असून पहिल्या तीन विद्यार्थ्यांना अनुक्रमे २५०००, १५०००,व १००००अशी बक्षिसे व सहभागी विद्यार्थ्यांना ई-सर्टिफिकेट सुद्धा देण्यात येणार आहेत.
यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन www.does.dypgroup.edu.in व प्रत्यक्ष महाविद्यालयात अशा पध्दतीने नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे.
तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment