केएलईकडून चंदगड तालुक्यात ५ संपर्क प्रमुखांची नेमणूक, डाॅ. कोरे यांचे प्रयत्न, चंदगडकराना मिळणार आता सुलभ सेवा - चंदगड लाईव्ह न्युज

04 February 2022

केएलईकडून चंदगड तालुक्यात ५ संपर्क प्रमुखांची नेमणूक, डाॅ. कोरे यांचे प्रयत्न, चंदगडकराना मिळणार आता सुलभ सेवा

  


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
सर्व प्रकारच्या उपचारासाठी चंदगड तालुक्यातील बहुतांश जनता बेळगाव येथील केएलई हॉस्पीटलमध्ये जात असते.या सर्व गोष्टींचा विचार करत चंदगड तालुक्यातील जनतेला अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळावी यासाठी बेळगाव येथील केएलई संस्थेने कानूर, कोवाड, अडकूर, पाटणेफाटा, हेरे या विभागात या पाच संपर्क प्रमुखांची नियुक्ती केली आहे. केेेलईचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी याबाबत विशेष योगदान दिले आहे. यामुळे आता चंदगड तालुक्यातील नागरिकांना केएलई हॉस्पीटल मध्ये सुलभ सेवा मिळणार आहे.
             गेल्या डिसेंबर महिन्यात डाॅ. प्रभाकर कोरे यांनी केंद्र शासनाच्या कृषीमंत्रालयाचे सल्लागार गुडेवाडी (ता. चंदगड) येथील डॉ. परशराम पाटील यांच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. पाटील यांनी या तालुक्यातील आरोग्य सेवेचा प्रश्न मांडला होता. संस्थेने या विभागात रुग्णालय सुरू करावे , अशी मागणी केली होती. परंतु ग्रामीण भागात उच्चशिक्षित डॉक्टर येत नाहीत, असे प्रयोग कर्नाटकात इतरत्र केले. परंतु त्याला यश आले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याला पर्याय म्हणून तालुक्यात संपर्कप्रमुख नियुक्त करायचे. रुग्णाच्या नातेवाईकाने त्याच्याशी संपर्क साधल्यानंतर तो त्या रुग्णाला रुग्णवाहिकेच्या माध्यमातून केएलईमध्ये पोहचवेल. तेथे त्याच्यावर योग्य ते उपचार केले जातील अशी संकल्पना कोरे यांनीच मांडली. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील पाच उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यांना या कामासाठी नियुक्त केले आहे. कानूर, कोवाड, अडकूर, पाटणेफाटा, हेरे या विभागात हे संपर्कप्रमुख काम करणार आहेत. त्यांना पंधरा दिवसाचे प्रशिक्षण, रुग्णालयामार्फत दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.



No comments:

Post a Comment